spot_img
spot_img

बुलढाण्यात ‘भीम ज्वाला’ पेटणार! जयंती उत्सवात जनसागर उसळणार

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाण्यात यंदा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळणार आहे. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पत्रकार परिषदेत या भव्य सोहळ्याची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, तीन दिवस शहर ‘भीममय’ होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

समितीचे अध्यक्ष पवन भालेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 एप्रिलपासून कार्यक्रमांची दमदार सुरुवात होणार आहे. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीम गीतांनी वातावरण भारावणार आहे. त्यानंतर 12 एप्रिल रोजी प्रा. विठ्ठल कांगणे यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनावर जाहीर व्याख्यान होणार आहे, जे तरुणांसाठी दिशा देणारे ठरणार आहे.

13 एप्रिल रोजी संतोष जोंधळे यांचा भव्य भीम गीतांचा कार्यक्रम गांधी भवन येथे रंगणार असून, मध्यरात्री जयस्तंभ चौकात ‘भीम जल्लोष’ आणि आतषबाजीने आकाश उजळणार आहे. 14 एप्रिल रोजी सकाळी भव्य मोटारसायकल रॅली, 135 किलो मोतीचूर लाडूंचे वाटप आणि माजी सैनिक, पोलीस बँड व समता सैनिक दलाकडून मानवंदना दिली जाणार आहे.

सायंकाळी निघणारी भव्य मिरवणूक हा या सोहळ्याचा कळस ठरणार असून, हजारोंच्या उपस्थितीत शहरात अभूतपूर्व उत्साह उसळणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!