spot_img
spot_img

साहित्या मधुन समाजाला दिशा मिळते.. ! ॲड.क्षितीज अनोकार कवी अरुण बोरसे यांच्या ‘ पुर्णाकाठच्या कविता ‘ संग्रहाचे प्रकाशन..

ज.जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) कवी अरुण विश्वनाथ बोरसे यांच्या ‘ पुर्णाकाठच्या कविता ‘ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले . जळगाव जा. येथील जगदंबा देवी संस्थानचे सभागृहात पार पडलेल्या या प्रकाशन समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थान चे अध्यक्ष सुरेशसेठ मानपुत्रे तर प्रमुख अतिथी म्हणून सरकारी अभियोक्ता गृह विभाग ॲड . क्षितिज नागोराव अनोकार मंचावर उपस्थित होते. कवी अरुणजी बोरसे हे अल्पशिक्षित असले तरी त्यांची दृष्टी फार मोठी व कष्टकऱ्यांचा मोठा आशय सांगणारी आहे . त्यांच्या कवितांमधून त्यांनी फार मोठा आदर्श समाजासमोर मांडला आहे . साध्या साध्या शब्दातून जीवनाचे वास्तव सांगत व्यक्त झालेल्या या कवीने त्यांच्या कवीता व साहित्या मधून समाजाला दिशा देण्याचे अनमोल काम केले आहे . पुर्णा काठच्या कविता संग्रहातून त्यांनी या परिसरातील गोरगरीब जनतेचे सुख दुःख निसर्ग पर्यावरण आपली संस्कृती यातून वर्णन केली आहे . येथील माणसांची नाळ ही शेती मातीशी जुळली असून शेतीत राबणारी माणसं आज आर्थिक दृष्ट्या खचलेली असताना त्यांना धीर देण्याचे सत्कार्य कवी अरुण बोरसे यांनी आपल्या कवितांमधून केले असे प्रतिपादन ॲड .क्षितिज अनोकर यांनी बोलताना केले . ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी यांनी शुभेच्छा पर बोलताना या कविता संग्रहाच्या लेखनाची मुक्त कंठाने प्रशंसा केली . ग्राम निरोड तालुका संग्रामपूर येथील मूळ रहिवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले कवी अरुण बोरसे यांनी मनोगत व्यक्त करताना प्रिंट मीडियाची भरभरून प्रशंसा केली . लिहिलेल्या कविता शेतकरी शेतमजुरांचे मुखपत्र असलेल्या दैनिक देशोन्नती सह इतरही काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होत गेल्याने कविता लिहिण्याची प्रेरणा वाढत गेली व यामुळे च पूर्णा काठच्या कविता हा काव्यसंग्रह आज प्रकाशित झाला याचा आनंद आहे असे ते यावेळी म्हणाले . यावेळी संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचे वतीने कवी अरुणजी बोरसे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी मंचावर वरील मान्यवरांसह देशोन्नती तालुका प्रतिनिधी काशिनाथ मानकर तरुण भारतचे रवींद्र दांडगे जगदंबा संस्थां न चे उपाध्यक्ष राजेशसेठ डोंगरकर सचिव रामशेठ सिंधीकर यांचे सह इतरही मान्यवर उपस्थित होते . यावेळी संजय बोरसे प्रवीण हुर पडे भगवान बोरसे गजानन बेंदरकर गोपाल बोरसे अनंत हुरपडे उदय वडतकर भिकाजी बोरसे शंकरराव खापरे दिनकर अष्टकार रमेश मानपुत्रे निलेश बोरसे संदीप बाळ श्रीराम अनोकर नंदाताई चौधरी सुधाकर मुरकर स्वप्निल चौधरी पुष्पाताई बाळ नंदू बोरसे अरुण बेंदरकर मनीष पांडे अन्वेष बोरसे यांचे सह संस्थानचे सर्व संचालक व समाज बांधव परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते . संचलन निवृत्त मुख्याध्यापक विलास सारभुकन यांनी केले . दुसरे दिवशी काल ३ एप्रील रोजी याच संस्थान मध्ये पार पडलेल्या चैत्र पोर्णीमा उत्सवचे महाप्रसादाचे कार्यक्रमात माजी मंत्री आ . डॉक्टर संजय कुटे यांनी कवी अरुण बोरसे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व पुर्णाकाठच्या कविता या काव्यसंग्रहाची प्रशंसा करून कवी अरुण बोरसे यांना शुभेच्छा दिल्या .

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!