बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठा बदल करत बुलढाण्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची बदली केली आहे. त्यांच्या जागी आयएएस अधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, डॉ. देवरे यांना पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्त पदावरून बुलढाण्यात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
शासनाच्या आदेशानुसार, डॉ. किरण पाटील यांची नियुक्ती आता आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे या पदावर करण्यात आली असून त्यांनी तातडीने नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दोन्ही अधिकाऱ्यांना कार्यभार हस्तांतरणाची प्रक्रिया त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या अचानक झालेल्या बदलामुळे बुलढाणा जिल्ह्यात प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. डॉ. देवरे यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील प्रशासनाला नवी दिशा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.डॉ. देवरे 2005 साली बुलढाण्याचे महसूल अधिकारी होते.त्यांना अगोदरच बुलढाणा जिल्ह्याचा अभ्यास आहे हे विशेष










