चिखली (हॅलो बुलढाणा) संपूर्ण चिखली शहरांमध्ये नाल्यांची साफसफाई नसल्याने नाल्यांमध्ये तुडुंब कचरा साचला असून जागोजागी नालीचे पाणी रस्त्यावर येत असून नालीत साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तरी चिखली नगरपालिकेने संपूर्ण चिखली शहरात नाल्यांची साफसफाई करून जंतुनाशक फवारणी करावी अशी मागणी युवासेना
(उबाठा) चिखली शहर प्रमुख आनंद गैची यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे दि.८ जुलै रोजी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद की, संपुर्ण चिखली शहरामध्ये फवारणी करणे व नाल्यामध्ये साचलेले पाणी, जागोजागी दिवसभर साचलेला कचरा सांडपाण्याने भरुन वाहणारी गटारे आणि नाल्यामुळे शहरात डासांची पैदास होण्यास पोषक वातावरण निर्माण होत आहे. यामुळे आठवडयातुन दोनदा धूर फवारणी आणि दोनवेळा औषध फवारणी करण्याचे प्रशासनाचे आदेश असले तरी या कामाकडे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडुन टाळाटाळ केली जात आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडुन फवारणी केल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात ही फवारणी नियमित केली जात नाही. रात्रीच नव्हे तर दिवसाही डास घोंगावत असल्यामुळे लहान मुलांसह मोठयांना या डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. नालेसफाईचे तिनतेरा वाजलेले असुन नाल्यांवर ढापे टाकलेले नसल्यामुळे गल्लोगली दुकान ,मकान दवाखाने ,शाळा, महाविद्यालय कॉलेज खेळण्याचे ग्राउंड बाजार भरणे शहरातील नगरातील एकही ठिकाण नाही. जिथे मच्छराचा मुक्तपणे संचार दिसुन येत नाही सर्व नागरिक हतबल झालेले आहेत.
तरी शहरातील प्रत्येक प्रभागातील कचरा नियमित उचलण्यासह पाणी साचणाऱ्या आणि कचरा साचलेल्या ठिकाणी नियमित फवारणी केल्यास डासांच्या अळया नष्ट होऊ शकतील मात्र प्रशासनाकडुन कोणत्याही प्रकारची फवारणी केली जात नाही. नागरीकांना होणाऱ्या त्रासाबद्दल प्रशासनाला आपल्या जबाबदारीची जाणीव होत नसुन फवारणची मागणी केल्यानंतरच प्रशासनाला फवारणीची आठवण होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी तात्काळ नाल्यांची साफसफाई व जंतुनाशक फवारणी करण्यात यावी नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात असा इशारा युवासेना चिखली शहर प्रमुख आनंद गैची यांनी नगर पालिका प्रशासनाला दिला आहे.