spot_img
spot_img

चिखलीत ‘सपासप’ तलवारींचा थरार; आई रेणुका मातेच्या यात्रेत दलेर खालसा ग्रुपचा धडाकेबाज स्टंट शो!

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) चिखली नगरीत आई रेणुका मातेच्या यात्रेनिमित्त आज अक्षरशः थरार आणि जल्लोषाचा स्फोट पाहायला मिळाला. शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या वहन मिरवणुकीदरम्यान अमृतसरहून आलेल्या दलेर खालसा ग्रुपने ‘सपासप’ तलवारींचे थरारक स्टंट सादर करत उपस्थितांची श्वास रोखून धरली.

चिखली नगर परिषदेसमोर रंगलेल्या या स्टंट शोमध्ये तलवारींचे वेगवान वार, अंगावर काटा आणणारे कसरती आणि अचूक समन्वय यामुळे प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले. प्रत्येक स्टंटनंतर टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष उसळत होता. या थरारक सादरीकरणासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

विशेष म्हणजे, रेणुका देवीच्या यात्रेसाठी हा ग्रुप थेट अमृतसरहून चिखलीत दाखल झाला असून, सुमारे 10 ते 12 जणांचा त्यात समावेश आहे. त्यांच्या धाडसी आणि शिस्तबद्ध सादरीकरणामुळे यात्रेचे आकर्षण अधिकच वाढले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!