spot_img
spot_img

डफड्याच्या तालावर तुपकरांचा ठेका; खुपगाव यात्रेत रंगली जल्लोषमय झिंग!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील खुपगाव येथे पारंपरिक देवी यात्रेत यंदा अनोखा रंग पाहायला मिळाला. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देवीच्या सोंगासमोर थेट डफड्याच्या तालावर ठेका धरत उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. शेकडो वर्षांची परंपरा जपणाऱ्या या यात्रेत तुपकर दरवर्षीप्रमाणे सहभागी झाले; मात्र यंदा त्यांनी दाखवलेले आगळे-वेगळे रूपच चर्चेचा विषय ठरले.

भाविकांच्या आग्रहाला मान देत तुपकरांनी पारंपरिक डफडे हाती घेतले आणि ताल धरताच वातावरणात एकच जल्लोष उसळला. देवीला पावली दाखवत सादर केलेल्या त्यांच्या पारंपरिक नृत्याने ग्रामस्थांचा उत्साह शिगेला पोहोचला. फक्त नृत्यच नाही, तर स्वतः वाद्य वाजवत इतरांनाही प्रोत्साहित करत त्यांनी यात्रेचा रंग द्विगुणित केला.

ग्रामीण संस्कृतीशी घट्ट नाळ जपणारा नेता म्हणून तुपकर पुन्हा एकदा चर्चेत आले असून, त्यांच्या या रूपाने उपस्थित ग्रामस्थ आणि भाविक अक्षरशः अवाक झाले. खुपगावची यात्रा यंदा तुपकरांच्या ठेक्यामुळेच विशेष ठरल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!