spot_img
spot_img

💥मेहकर BREAKING: आमदाराला खेचून मारण्याची भाषा, पोलिस शांत?

मेहकर (हॅलो बुलढाणा) शहरात राजकीय वातावरण सध्या अक्षरशः पेटले असून एका शिवसैनिकाच्या भडक आणि वादग्रस्त वक्तव्याने खळबळ उडाली आहे. शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने पत्रकार परिषदेत थेट ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांना उद्देशून “कोणीही असू द्या, आमदारालाही बाहेर काढून झपकवू,” अशी उघड धमकी दिल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

सदर पत्रकार परिषदेत बोलताना संदीप तठ्ठे यांनी माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या कामाचे श्रेय इतरांनी घेऊ नये, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. यावेळी त्यांनी “आमच्यावर आधीच २५-२५ गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही,” असे उघडपणे सांगितले. या वक्तव्यामुळे कायद्याचा धाक संपला आहे का, असा गंभीर सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, दोन शिवसैनिकांमधील हा वाद आता उघड संघर्षात बदलण्याची चिन्हे दिसत असून मेहकरमधील राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इतक्या गंभीर धमकीनंतरही अद्याप संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाही? कायद्याचे खुलेआम आव्हान देणाऱ्या या वक्तव्यावर पोलीस प्रशासन कोणती ठोस कारवाई करणार, याची उत्सुकता वाढली आहे.

मेहकरमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलली जातील का, की हे प्रकरणही राजकीय दबावाखाली दडपले जाईल, हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!