spot_img
spot_img

💥EXCLUSIVE सर्पमित्राचा जीव गेला… पण ॲम्ब्युलन्सला हवे होते पैसे! बुलढाण्यातही ॲम्ब्युलन्सचा ‘पैशांचा खेळ’? पतसंस्था-प्रतिष्ठानच्या नावावर ५ ते २० हजारांची वसुली!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जीव वाचवण्यासाठी आयुष्यभर धावणाऱ्या सर्पमित्राचा शेवट मात्र पैशांच्या निर्दयी खेळात झाला, ही अत्यंत संतापजनक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना खामगाव तालुक्यातील जनुना येथे समोर आली आहे. साप पकडून जंगलात सोडताना झालेल्या सर्पदंशानंतर मंगेश प्रकाश कांबळे (वय ३२) यांना तातडीने उपचारासाठी अकोल्याकडे नेले जात होते. मात्र, खिशात पुरेसे पैसे नसल्याचे कारण देत ॲम्ब्युलन्स चालकाने रुग्णवाहिका अर्ध्या वाटेतूनच परत फिरवल्याचा धक्कादायक आरोप नातेवाईकांनी केला आहे. या अमानुष प्रकारामुळे उपचाराला विलंब झाला आणि यातच मंगेशचा मृत्यू झाल्याचा संतापजनक आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

जनुना गावातील मंगेश कांबळे हे धाडसी आणि तत्पर सर्पमित्र म्हणून ओळखले जात होते. गावात कुठेही साप दिसला की, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते धावत पोहोचायचे. अनेक वेळा विषारी साप पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडत त्यांनी अनेकांचे जीव वाचवले होते. पण आज त्याच सर्पमित्राला वेळेत उपचार मिळाले नाहीत आणि पैशांच्या अडथळ्यामुळे त्यांचा जीव गेला, ही बाब समाजाला हादरवणारी आहे.

दरम्यान, या घटनेनंतर नातेवाईकांनी संबंधित ॲम्ब्युलन्स चालकावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. “मंगेशमुळे अनेकांचे जीव वाचले… पण आज त्यालाच मदत मिळाली नाही,” अशा शब्दांत गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

या प्रकरणानंतर बुलढाणा जिल्ह्यातील ॲम्ब्युलन्स व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही मोजके सेवाभावी चालक सोडले तर अनेक खाजगी ॲम्ब्युलन्स, काही प्रतिष्ठान, पतसंस्था आणि राजकीय पुढाऱ्यांच्या नावावर चालणाऱ्या ॲम्ब्युलन्सकडून ५ हजार ते २० हजार रुपयांपर्यंत मनमानी शुल्क आकारले जात असल्याचे वास्तव समोर येत आहे.

गरीब रुग्णांच्या जीवाशी असा पैशांचा खेळ थांबणार कधी?

असा संतप्त सवाल आता जनतेतून विचारला जात असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून या बेकायदेशीर वसुलीवर लगाम लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!