spot_img
spot_img

धक्कादायक! बुलढाणा पोलीस मुख्यालयातील हेड कॉन्स्टेबलची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा पोलीस दलाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल पंजाबराव शेळके यांनी मेहकर तालुक्यातील बाबुलखेड येथील शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पोलीस वर्तुळासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंजाबराव शेळके हे बुलढाणा पोलीस मुख्यालयात हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. रविवारी बाबुलखेड परिसरातील एका शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. ही बाब समोर येताच परिसरात मोठी गर्दी झाली होती.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पुढील तपासासाठी आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, शेळके यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे पोलीस दलातही हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!