spot_img
spot_img

शेगाव हादरलं! तरुणीला अश्लील फोटोने ब्लॅकमेल; ‘संबंध ठेव नाहीतर फोटो व्हायरल’ – विकृत धमकी देणारा पोलिस कोठडीत!

शेगाव (हॅलो बुलडाणा) शहरात महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी संतापजनक घटना उघडकीस आली असून, एका २१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीला अश्लील फोटोच्या माध्यमातून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय मोहम्मद शाकीर या तरुणाने पीडित विद्यार्थिनीला तिचे खाजगी आणि अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर संबंध ठेवण्याचा दबाव टाकला. “माझ्याशी संबंध ठेव आणि संभाषण सुरू ठेव, नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर टाकीन,” अशी घृणास्पद धमकी देत आरोपी सतत मानसिक छळ करत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने सामाजिक कार्यकर्त्यांकडे मदतीची धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच संतप्त कार्यकर्ते आणि नागरिकांनी आरोपीला पकडून चांगलाच धडा शिकवला आणि त्याला शेगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तत्काळ विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेला काहीजणांकडून चुकीचं धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचंही समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथेही विद्यार्थिनी छळाच्या घटनेनंतर अशाच अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे पोलिस प्रशासनाने स्पष्ट इशारा देत नागरिकांना आवाहन केलं आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!