spot_img
spot_img

सवना येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ!

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) तालुक्यातील सवना येथे २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुभम गजानन अफ्रूतकर असे मृत तरुणाचे नाव असून ही घटना काल सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या दरम्यान घडली. स्वतःच्या घरात दोरीने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे सवना परिसरात एकच खळबळ उडाली असून तरुणाच्या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पीएसआय सुसूर साहेब व लक्ष्मण जाधव करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!