spot_img
spot_img

सुलतानपूरमध्ये पत्रकाराची दुचाकी लंपास; चोरट्यांचा हैदोस सुरूच!

सुलतानपूर (हॅलो बुलडाणा/मोईन खान)
शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, चक्क एका पत्रकाराची दुचाकी चोरट्यांनी घरफोडीच्या स्टाईलने लंपास केल्याची घटना घडली आहे. सुलतानपूर येथील रहिवासी आणि पत्रकार मोईन खान मन्नान खान पठाण यांची दुचाकी आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पळवून नेली.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मोईन खान यांनी आपली दुचाकी (क्रमांक: MH 28 AV 9284) नेहमीप्रमाणे आपल्या घरासमोर उभी केली होती. बुधवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी संधी साधून ही दुचाकी लंपास केली. सकाळी जेव्हा ही बाब लक्षात आली, तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली.सुलतानपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, आता थेट पत्रकाराचीच गाडी चोरीला गेल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!