spot_img
spot_img

जोरदार टक्कर अन् क्षणात सर्व संपलं! चिखलीत बोंद्रे ठार

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) चिखली-धाड रोडवरील साकेगावजवळ आज सकाळी सुमारे 10 वाजताच्या दरम्यान भीषण अपघात होऊन दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात राजेश बोन्द्रे (वय 55, रा. चिखली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश बोन्द्रे हे सकाळी आपल्या दुचाकीवरून साकेगाव येथील शेतात जात असताना समोरून येणाऱ्या पॅसेंजर अपेने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की बोन्द्रे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

अपघातात अपे चालकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे साकेगाव परिसरात संताप व्यक्त होत असून अपघातग्रस्त मार्गावरील वाहतुकीच्या बेफिकिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.या प्रकरणी चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!