spot_img
spot_img

नियंत्रण सुटलेली कार झाडावर धडकली; चिखलीतील पत्रकाराचा अंत

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) चिखली-खामगाव-जालना महामार्गावर छोटा मेरा व असोला दरम्यान भीषण अपघातात चिखलीतील पत्रकार राजेंद्र (राजू) सुरडकर (वय अंदाजे ३६ ते ३७, रा. बेराळा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पत्रकारितेच्या वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरडकर हे स्विफ्ट डिझायर कारमधून अन्य तिघांसह प्रवास करत होते. भरधाव वेगात असलेली कार अचानक नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या झाडावर जोरात आदळली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला. चार जणांपैकी राजेंद्र सुरडकर यांना गंभीर दुखापत झाली असून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित तिघेजण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील जाहिराती व उपक्रमांना प्रोत्साहन देणारे, चिखली परिसरात सक्रिय असलेले सुरडकर यांच्या अकाली निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!