spot_img
spot_img

कारसह दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश; पोलिसांच्या सापळ्यात तीन सराईत आरोपी

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शेगांव शहरात घरफोडी करून दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने चांगलाच धक्का दिला आहे. निलेश तांबे यांच्या आदेशानंतर पोलिसांनी आक्रमक कारवाई करत तीन सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या असून सोने, हुंडाई कार व मोबाईल असा तब्बल ६ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दि.५ ते ८ फेब्रुवारीदरम्यान घरफोडी करून कारसह दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा माग काढत पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जालना जिल्ह्यातून आरोपींना पकडले. राजेंद्र राऊत, राजेश शर्मा व श्रीराम सोनवणे या तिघांवर आधीपासून अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. तपासादरम्यान आरोपींनी अकोला जिल्ह्यातील आणखी दोन घरफोड्यांची कबुली दिल्याने गुन्हेगारी साखळीचा मोठा पर्दाफाश झाला.

या धडक कारवाईत सपोनि यशोदा कणसे, PSI अविनाश जायभाये, दीपक लेकुरवाळे, शेख चाँद, गणेश पाटील, गजानन गोरले, निवृत्ती पुंड, राजू आडवे व ऋषी खंडेराव यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणासह धाडसी कामगिरी बजावली

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!