खामगाव (हॅलो बुलडाणा) अकोला हायवे रोडवर भरधाव ट्रकच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या भीषण अपघातात दोन गायींचा जागीच मृत्यू झाला तर एक गाय गंभीर जखमी झाली. ही हृदयद्रावक घटना ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास घडली. अकोल्याकडे जात असलेल्या ट्रक चालकाने वेगावर नियंत्रण न ठेवल्याने रस्त्यावर असलेल्या तीन गायींना चिरडत पुढे पोबारा केल्याची माहिती समोर आली आहे.
अपघात इतका भीषण होता की एका गायीचा अक्षरशः चुराडा झाला होता. विशेष म्हणजे, बराच वेळ गायी रस्त्यावरच पडून असूनही ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला नाही, ही बाब संतापजनक ठरली आहे. घटनेची माहिती मिळताच एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे सुरजभैय्या यादव, अमोल तायडे, मनोज यादव व सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृत गायी बाजूला केल्या तसेच जखमी गायीला सुरक्षितस्थळी हलवले. गौधारक ओबीसी नेते गणेश चौकसे यांनाही याबाबत कळवण्यात आले असून जखमी गायीवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.










