spot_img
spot_img

चिखलीच्या मीरा हॉटेलसमोर थरारक अपघात; एक ठार, एकाची मृत्यूशी झुंज!

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) खामगाव-जालना हायवेवरील मीरा हॉटेलसमोर काल रात्री सुमारे ८:३० वाजेच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला. सुरा सरंबा ता. देऊळगाव राजा येथील स्वप्नील दिनकर चेके (वय ३०) हे बुलढाणाहून आपल्या गावी परत जात असताना चिखली MIDC मधून अचानक एक दुचाकी हायवेवर आडवी आल्याने दोन दुचाकींची जोरदार धडक झाली. या अपघातात स्वप्नील चेके यांचा जागीच मृत्यू झाला, तर उत्तर प्रदेश येथील शंकर प्रसाद हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जालन्याकडे हलविण्यात आले आहे. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला असून चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास चतरकर व ज्ञानेश्वर शिंदे पुढील तपास करत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!