मोताळा (हॅलो बुलडाणा) कुऱ्हा गोतमारा ते मलकापूर बस गाडी क्र MH40 N9486 रोडवर सुरू असलेल्या कामातील हलगर्जीपणामुळे आज कोऱ्हाळा बाजार खेळी मार्गावर अपघात घडला. रोडचे काम सुरू असताना साईट अरुंद ठेवण्यात आली होती, त्यातच समोरून येणाऱ्या टिपरमुळे बसचालकाला अंदाज घेता आला नाही. रस्त्यावर टाकलेल्या काचे मुरूमामुळे बस अचानक घसरली आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेत २ ते ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. विशेष म्हणजे, काम सुरू असताना योग्य सुरक्षा व्यवस्था, सूचना फलक किंवा वाहतूक नियंत्रण नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून, संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.










