spot_img
spot_img

पल्सरवर आले अन् पोत हिसकावून पसार! मलकापूर पोलिसांना खुलं आव्हान

मलकापूर (हॅलो बुलडाणा) शहरात चोरट्यांचा धुमाकूळ वाढत असून भरदिवसा महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना 3 फेब्रुवारी रोजी घडली. अर्बन बँक कॉलनी परिसरात राहणाऱ्या व नगर परिषद मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षिका सौ.मेघा देशमुख या सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पायी घरी जात असताना जनता कॉलेजच्या मागे समर्थ डेअरीसमोर दोन अज्ञात इसमांनी पल्सर मोटारसायकलवरून येत त्यांच्या गळ्यातील अंदाजे 28 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून नेली.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलेच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी फरार झाले. विशेष म्हणजे ही पोत शिक्षिकेने स्वतःच्या पगारातून थोडी-थोडी रक्कम साठवून बनविल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांनी गस्त वाढवून आरोपींना तातडीने अटक करावी, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे. मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार सुनील राऊत करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!