spot_img
spot_img

सावधान! वडगाव तेजन टोल नाक्यावर यमराज टपून बसलेत?

सुलतानपूर (हॅलो बुलडाणा/मोईन खान)
एकीकडे रस्ते विकासाचे दावे केले जात असताना, दुसरीकडे लोणार परिसरातील वडगाव तेजन टोल नाका वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. काल रात्री पुन्हा एक जड मालवाहू ट्रक उलटल्याने येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच याच वळणावर एका आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला होता. ही घटना ताजी असतानाच, राजस्थान पासिंगचा ट्रक (क्र. R.G. 32 G.C. 5152) टोल नाक्याजवळून जात असताना अचानक पलटी झाला. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत. नशिबाने मोठी जीवितहानी टळली असली तरी, ट्रकचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!