spot_img
spot_img

ट्रकच्या थैमानात बँक शाखा व्यवस्थापक ठार; उदयनगर जवळ भीषण अपघाताने खळबळ!

अमडापूर (हॅलो बुलडाणा) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा केंद्रीय बँकेच्या उदयनगर शाखेचे शाखा व्यवस्थापक स्व. विजय माधव आराख रा. सावित्रीबाई फुले नगर परिसर बुलढाणा यांचा दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी एका भरधाव ट्रकच्या धडकेत दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. उदयनगर परिसरातील डासाळा गावाजवळ हा भीषण अपघात घडला. स्व. आराख हे दुचाकीवरून बुलढाण्याकडे येत असताना ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या ट्रकने याच ठिकाणी आणखी दोन जणांना उडवल्याची प्राथमिक माहिती असून,परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. अमडापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित ट्रक ताब्यात घेतल्याची माहिती आहे. निष्काळजी व वेगाने वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!