spot_img
spot_img

डुलकी पडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं! समृद्धी महामार्गावर ट्रक पलटी, थरारक दृश्ये

डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नसून, काल गुरुवार ३० जानेवारी रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास आणखी एक भीषण अपघात घडला. चालकाला आलेली झोपेची डुलकी या अपघाताचे मुख्य कारण ठरले असून,नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक २६८ जवळ भरधाव ट्रक महामार्गावरून खाली उतरून पलटी झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, बारदाना (रिकामी पोती) भरलेला ट्रक (WB 23 E 6417) मुंबईहून नागपूरच्या दिशेने जात होता. डोणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालक सुनील कुमार मोरया याला अचानक डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट पलटी झाला. अपघातात चालक किरकोळ जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चालक व वाहकाला सुरक्षितपणे ट्रकबाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने मेहकर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघातग्रस्त ट्रकमधील मालाची चोरी होऊ नये म्हणून डोणगाव पोलिसांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!