spot_img
spot_img

पुण्यात लपलेले ‘खुनाचा प्रयत्न’ करणारे आरोपी बुलढाणा पोलिसांच्या मुस्कटात! – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपींना अखेर बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातील वाघोली परिसरातून ताब्यात घेऊन आपली कार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड (बुलढाणा) व अपर पोलीस अधीक्षक श्री. श्रेणिक लोढा (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने ही कारवाई पार पडली.

पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक 09/2026 अन्वये कलम 109(1), 115(2), 352, 351(3), 3(5) बि.एन.एस. 2023 अंतर्गत पाहिजे आरोपी सुरज मोतीराम पसरटे (वय 23, रा. सुंदरखेड) व आदेश सुनील राठोड (वय 22, रा. आयटीआय कॉलनी, बुलढाणा) हे पुण्यात लपून बसल्याची माहिती तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीद्वारे मिळाली.

त्यानुसार PSI अविनाश जायभाये व त्यांच्या पथकाने थेट वाघोली गाठत दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.या धडाकेबाज कारवाईत PSI अविनाश जायभाये, HC दिपक लेकुरवाळे, HC चांद शेख, HC गणेश पाटील, PC गजानन गोरले, TAW, HC राजू आडवे, HC पवन मखमले व चापोकॉ. निवृत्ती पुंड यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!