spot_img
spot_img

💥दुर्दैवी! त्र्यंबकेश्वर पुलाजवळ हायवा पलटी; बुलढाणा-चिखलीचे तरुण-तरुणी जागीच ठार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) श्रद्धेच्या प्रवासात गेलेली मुलं परतताना काळाने निर्दयपणे झडप घातली. त्र्यंबकेश्वर नगरीत काल शनिवारी (दि. ३) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडलेला हायवा अपघात दुर्दैवी ठरला. शिवम राजेश उंबरहांडे (वय २२, रा. पांगरी उंबरहांडे, ता. चिखली) आणि भूमिका समाधान खेडेकर (वय २१, रा. अंतरी खेडेकर, ता. चिखली) हे दोघे दुचाकीवरून नाशिकच्या दिशेने जात असताना गोदावरी नदीवर असलेल्या पुलाजवळ हायवा (क्र. एमएच १५ जेआर ४४०४) पलटी होऊन त्यांच्यावर कोसळले.

हायवामध्ये मोठ्या प्रमाणावर डेब्रिस वाहून नेत होते. त्यातील दगड आणि अवजड वस्तूंच्या जोरदार ठोकेने शिवम आणि भूमिका जागीच ठार झाले. अपघाताचे दृश्य पाहून जव्हार त्रिफुलीवरी पोलिस चौकीतील कर्मचारी आणि स्थानिकांनी त्वरित जेसीबी बोलावून दोघांना हायवाखालीून बाहेर काढले, पण तेव्हा खून झालेल्या दोघांचा जीव वाचवता आला नाही.

दुर्दैवाची बाब म्हणजे, कालच शिवमचा वाढदिवस होता आणि तो आपल्या वाढदिवसाच्या आनंदासाठी त्र्यंबकेश्वर दर्शनाला जात होता. या घटनेमुळे भाविकांमध्ये, स्थानिकांमध्ये संतापाची लाट उठली आहे. नागरिकांनी अवैध आणि बेशिस्त हायवा वाहतुकीला कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!