बुलढाणा (हॅलो बुलडाणा/जितेंद्र कायस्थ) बुलढाणा अर्बन बँकेबाबत सध्या जाणीवपूर्वक आणि योजनाबद्ध पद्धतीने अफवा पसरविल्या जात असून, काही लोक गैरसमज करून घेत बँके पुढे गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र नागरिकांनी भावनेच्या भरात येऊन स्वतःचेच आर्थिक नुकसान करून घेऊ नये, असे ठामपणे सांगणे अत्यंत गरजेचे आहे.
बुलढाणा अर्बन ही केवळ एक संस्था नसून, तो एक विश्वासाचा ब्रँड आहे. संत गजानन महाराज व राष्ट्रमाता माँ जिजाऊ आणि सैलानी बाबा यांच्या पवित्र भूमीत उभा राहिलेला हा विश्वास राधेश्याम देवकिसन चांडक उर्फ (भाईजी) आणि अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांनी रक्ताचे पाणी करून एका रोपट्याचे वट वृक्ष केले व करून दाखवले आहे. सामान्य गावातून उभा राहिलेला हा नेतृत्वाचा प्रवास आज संपूर्ण आशिया खंडात नाव कमावणारा ठरला आहे.भाईजींनी यापूर्वीच अधिकृत व्हिडिओद्वारे स्पष्ट केले आहे की, या अफवा एका हितचिंतकाने जाणून-बुजून पसरवल्या असून, ही बाब शंभर टक्के खरी आहे. माणूस मोठा झाला की त्याला खाली पाडण्यासाठी कसे डावपेच रचले जातात, हेच या प्रकारातून दिसून येते.
‘हॅलो बुलढाणा’ तर्फे सर्व नागरिकांना ठाम शब्दात सांगण्यात येते अफवांवर विश्वास ठेवू नका. स्वतःचेही नुकसान करू नका आणि या विश्वासाच्या संस्थेचेही नुकसान होऊ देऊ नका. भाईजींच्या नेतृत्वावर 100% हमी, 100% गॅरंटी!











