spot_img
spot_img

काशिनाथ बोंद्रे यांचे प्रत्येक पाऊल हे जनतेच्या हितासाठी! चिखलीला भय आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याचा महाविकास आघाडीचा अजेंडा

चिखली (हॅलो बुलडाणा) नगरपालिका निवडणुकीतील महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांनी शहरातील विविध प्रभागांतील संवाद सत्रांमध्ये नागरिकांशी मुक्त चर्चा केली. या संवादादरम्यान त्यांनी चिखली शहराला भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे हे आपले प्रमुख ध्येय असल्याचे स्पष्ट केले.

काशिनाथ बोंद्रे यांनी सांगितले की, माझे प्रत्येक पाऊल हे जनतेच्या हितासाठीच असणार आहे.महाविकास आघाडीच्या प्रचार सभांमध्ये भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा मुद्दा ठळकपणे समोर येत असून काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या या वक्तव्याने प्रचाराला सकारात्मक दिशा मिळाल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
प्रभागातील कार्यकर्त्यांच्या मते, चिखलीतील जनता सुरक्षित, स्वच्छ आणि सुशासनावर आधारित शहराची अपेक्षा करत असल्याने हा मुद्दा अधिक गांभीर्याने चर्चिला जात आहे.
शहरातील विविध प्रभागांमध्ये होत असलेल्या प्रचार सभांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, चिखलीतील लोकाभिमुख प्रशासन आणि पारदर्शक कारभार हा निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा ठरणार असल्याचे निरीक्षकांनी मत नोंदवले आहे.
काशिनाथ आप्पा बोंद्रे यांनी शहरातील नागरिकांशी संवाद साधताना आपल्या कार्यपद्धतीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. माझे प्रत्येक पाऊल हे चिखलीच्या हितासाठी असे म्हणत त्यांनी शहराच्या भविष्यासाठी जबाबदारीची भूमिका अधोरेखित केली.
चिखली शहरासाठी दीर्घकालीन नियोजन, सार्वजनिक सोयीसुविधांचे आधुनिकीकरण आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार ही आपली कामाची त्रिसूत्री राहणार असल्याचे, काशिनाथ आप्पा बोंद्रे यांनी प्रचार सभेत बोलताना सांगितले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!