spot_img
spot_img

बुलढाण्यात निवडणूक तापली;धमक्या, फोन कॉल, दहशत…‘शांत बसणार नाही!’- मा.आ.विजयराज शिंदें पोलीस स्टेशनला!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नगरपालिका निवडणुकीचीच नाही तर लोकशाहीची प्रतिष्ठा धोक्यात येऊ नये म्हणून बुलढाणा जिल्हा भाजप, राष्ट्रवादी (अजितदाद गट) आणि रिपब्लिकन पक्ष आक्रमक भूमिकेत आले आहेत. उमेदवारी छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्या माघारीची शेवटची तारीख आहे. त्यानंतर खरी निवडणूक लढाई पेटणार असताना शहरात गुंडागिरी, दहशत निर्माण करणे, निनावी फोनवरून धमक्या देणे अशा घटनांनी वातावरण ढवळून निघाले आहे.

यावर कठोर कारवाईची मागणी करत तिन्ही पक्षांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये तातडीचे निवेदन दाखल केले. लोकशाहीचा उत्सव भयमुक्त वातावरणात पार पडला पाहिजे. उमेदवारांना स्वातंत्र्याने प्रचार करता आला पाहिजे आणि मतदारांनी कोणत्याही दबावाशिवाय मतदान करता आले पाहिजे, अशी ठाम भूमिका भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी व्यक्त केली.

शिंदे यांनी स्पष्ट इशारा दिला की, राजकीय लागेबांधे असलेल्या कोणत्याही पोलिसांचा गैरवापर निवडणुकीत होऊ नये. गुन्हेगारांना तात्काळ अटक करा, दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!