मेहकर (हॅलो बुलढाणा/प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत काल संपली आणि त्याच क्षणी मेहकरच्या राजकीय वातावरणात अक्षरशः स्फोट झाला! शहरातील प्रत्येक चौकात, दुकानात, गल्लीबोळात एकच चर्चा “किशोर भाऊ येणार का?” अखेर जनतेचा अखंड आग्रह, कार्यकर्त्यांची हाक आणि प्रचंड मागणीमुळे शिवसेना (उबाठा) पक्षाने किशोर गारोळेंचे नाव नगराध्यक्ष पदासाठी अधिकृतपणे जाहीर करून मेहकरच्या राजकारणात मोठे वादळ उठवले आहे.
‘पब्लिक की डिमांड थी… किशोरभाऊ को आना पडा!’
या घोषणेने मेहकर शहर अक्षरशः हादरून गेले! घोषणा निघताच गारोळे समर्थकांनी जल्लोष केला.किशोर गारोळे हे मेहकरमध्ये लोकप्रिय आणि जनसामान्यांशी जोडलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. शहरातील नागरिकांमध्ये असलेला विश्वास, सततचे जनसंपर्क आणि शहराच्या विकासासाठी त्यांची स्पष्ट भूमिका यामुळेच लोकांनी त्यांच्यावर ‘नगराध्यक्ष’ म्हणून शिक्कामोर्तब केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. गारोळेंनीही उमेदवारीनंतर कार्यकर्त्यांचे आभार मानत शहराच्या एकत्रित विकासाचा संकल्प व्यक्त केला आहे.











