spot_img
spot_img

चिखली नगराध्यक्ष पदावर तिरंगी लढत पेटली! काँग्रेस–भाजप–राष्ट्रवादी आमनेसामने, निवडणूक रणांगणात थरारक वातावरण

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चिखली नगराध्यक्ष पदासाठी आज जाहीर झालेल्या उमेदवारीमुळे राजकीय वातावरण अक्षरशः पेटले आहे! तिन्ही प्रमुख पक्षांकडून दमदार चेहरे मैदानात उतरले असून शहरात चर्चेचा भडका उडाला आहे.

काँग्रेसकडून काशिनाथ बोन्द्रे यांनी दणक्यात प्रवेश केला असून परंपरागत मतदारांवर त्यांचा मजबूत पकड असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. दुसरीकडे भाजपने पंडित देशमुख यांच्यावर विश्वास ठेवत या निवडणुकीत आक्रमक रणनीती आखली आहे. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते शहरभर जोमात प्रचारयोजना आखत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून प्रा.निलेश गावंडे या चेहऱ्याची नावनोंदणी होताच राजकीय समीकरणात मोठी हलचल झाली आहे. तिन्ही उमेदवार ताकदीचे असल्याने चिखली नगराध्यक्ष पदाची लढत अभूतपूर्व आणि काट्याची होणार हे निश्चित!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!