बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नगरपरिषद निवडणुकीत आज अक्षरशः राजकीय रणधुमाळी उसळली आहे! शिवसेना (शिंदे) गटाकडून पूजाताई गायकवाड यांनी दमदार उमेदवारी अर्ज दाखल केला असून स्वतः आमदार संजय गायकवाड उपस्थित राहिल्यामुळे शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनाला मोठी झळाळी मिळाली. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही मागे न राहता लक्ष्मीताई दत्ता काकस यांचा उमेदवारी अर्ज भरत वातावरण तापवले आहे.
नगरपालिकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची अक्षरशः तुफान गर्दी उसळली असून, एकमेकांवर राजकीय ताकद दाखवण्याची स्पर्धा चांगलीच पेटली आहे. प्रत्येक पक्षाने आपापली ताकद झोकून दिल्याने संपूर्ण परिसर राजकीय घोषणांनी दणाणून गेला आहे.
येत्या काही क्षणातच भाजपच्या उमेदवाराची दमदार एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर येत असून, त्यानंतर बुलढाणा नगरपरिषद निवडणुकीची लढत आणखी चुरशीची होणार हे निश्चित! तीनही प्रमुख पटलांवरील घडामोडींमुळे शहरात राजकीय तापमान उच्चांकी स्तरावर पोहोचले आहे. बुलढाण्यातील ही निवडणूक कोणत्या दिशेने कलाटणी घेते, याकडे सर्वांचे डोळे खिळले आहेत.











