बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांप्रती आपला सच्चा स्नेह दाखवला आहे. शिवसेनेत सुरुवातीपासून आमदार संजुभाऊंसोबत खांद्याला खांदा लावून कार्य करणारे विजय ग्यानदेव दुरणे यांची बुलढाणा शहर शिवसेना (शिंदे गट) संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
आमदार गायकवाड यांनी आज ७ नोव्हेंबर २०२५ रोजी अधिकृत नियुक्तीपत्र देऊन ही जबाबदारी दुरणे यांच्यावर सोपवली. “संजुभाऊंनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षविस्तारासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा मी प्रयत्न करीन,” अशी प्रतिक्रिया विजय दुरणे यांनी दिली.
या नियुक्तीमुळे जुन्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असून, आ.संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की निष्ठा आणि सातत्याचे मोल शिवसेनेत नेहमी राखले जाते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, विजय दुरणे आता बुलढाणा शहरात पक्षवाढीसाठी नवी ऊर्जा घेऊन सज्ज झाले आहेत.











