बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ते सेवेमध्ये परिवार आणि भाजपाशी जवळीक राहिलेल्या अनंत नावाचा एक जूना कार्यकर्ता! या कार्यकर्त्यांने आज समाज माध्यांमावर पोलखोल केली.. भले हे स्वार्थासाठी व्यर्थ बडबड ठरू शकते..?
कारण हा आरोप एक वर्षा पूर्वी आम. संजय गायकवाड यांनी शिंदे यांचेवर केला होता. आता यात काय अर्थ राहिला नाही..’शिळ्या कढीला ऊत!’ असे शिंदे म्हणाले आहे.तब्बल 10 ते 15 वर्ष भाजपाशी निगडीत अनंत विविध पदावर कार्यरत राहीले. या दरम्यान वडीलांच्या देशसेवा अंतर्गत वारसा जोपासला. राजकीय सेवेत त्यांना पदे मिळाली. मात्र आता अचानक त्यांनी भाजपाला राम राम ठोकत त्यांनी माजी आम विजयराज शिंदे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या.
महाविकास आघाडी कडून 1 करोड रुपये घेतल्याचे अनंत यांनी मिडीयाला सांगितले. त्यातील चंदू बर्दे, शिंदे व मी स्वतः पैशे घेतल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. त्यामळे निवडणूक पैशाने होते कां? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान माजी आम. शिंदे म्हणाले की, अनंता शिंदे हा वैफल्यग्रस्त झालाय.. त्याला नगराध्यक्षपद पाहिजे आहे, त्यामुळे असे आरोप होत असल्याचे शिंदे यांनी सांगितले











