spot_img
spot_img

💥BREAKING अखेर प्रतिक्षा संपली! नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा; असं आहे टाईम-टेबल

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राज्यात गेल्या अनेक काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अखेर राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली. यावेळी नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, २ डिसेंबर २०२५ मतदान होणार असून ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळं आता राज्यात सगळीकडं राजकीय धुरळा पाहायला मिळणार आहे.

असा असेल कार्यक्रम?
नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात – १० नोव्हेंबर २०२५

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत – १७ नोव्हेंबर २०२५

नामनिर्देशनपत्राची छाननी – १८ नोव्हेंबर २०२५

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत (अपिल नसलेल्या) – २१ नोव्हेंबर २०२५

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत (अपिल असलेल्या) – २५ नोव्हेंबर २०२५

निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसंच अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी – २६ नोव्हेंबर २०२५

मतदानाचा दिवस – २ डिसेंबर २०२५

मतमोजणीचा दिवस – ३ डिसेंबर २०२५

शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस – १० डिसेंबर २०२५

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!