बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नगरपरिषद निवडणुकीचे पाऊल-पाऊल वारे वाहायला लागले आहेत. बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक ५ चे आरक्षण जाहीर होताच, भाजपा युवानेते इच्छुक उमेदवार मोहित भंडारी यांनी सर्वसाधारण गटातून निवडणूक लढण्याचा ऐलान फेसबुकवर केला. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय चर्चा जोरात सुरू झाली आहे.
मोहित भंडारी हे गेल्या १० वर्षांपासून भाजपा मध्ये सक्रीय असून, त्यांनी भाजपा विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा शहर महामंत्री अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते योगेंद्र गोडे यांच्या विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात. शिवलाल भंडारी यांचे नातू व माजी नगरसेवक नरेंद्र भंडारी यांचे पुतणे असल्यामुळे त्यांना राजकीय वारसा ही लाभलेला आहे.
प्रभाग ५ मध्ये मोहित भंडारीचे जनसंपर्क आणि प्रतिष्ठित नागरिकांशी मजबूत संबंध असून, ते सामाजिक व राजकीय कार्यात नेहमी सक्रिय राहतात. आजच्या त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे निवडणुकीत कोणत्या नावावर लक्ष जाईल, याची चर्चा जोरात सुरू आहे.