बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भाजपच्या जेष्ठ नेत्यांची परंपरा असलेल्या बाहेकर परिवारातून आता नगराध्यक्षपदासाठी नवीन इच्छुक चेहरा पुढे आला आहे! भाजप जेष्ठ नेते प्रा. जगदेवराव बाहेकर यांच्या सुनबाई आणि भाजयुमो जिल्हा संपर्क प्रमुख पद्मनाभ उर्फ सोनू बाहेकर यांच्या पत्नी सौ. निशा बाहेकर यांनी बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून उमेदवारीची प्रबळ इच्छा व्यक्त केली आहे.
प्रा. बाहेकर हे 1980 पासून पक्षाशी निष्ठेने जोडलेले असून त्यांनी शहराध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीस, तसेच होमगार्ड समादेशक आणि खामगाव अर्बन बँकेचे संचालक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पद्मनाभ बाहेकर यांनी 2002 पासून पक्षात सक्रिय भूमिका निभावत विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष, भाजप शहर सचिव, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस व संपर्क प्रमुख अशी विविध पदे भुषवली आहेत.बाहेकर कुटुंबाची तिन्ही पिढ्यांची पक्षनिष्ठा आणि समाजकारणातील योगदान पाहता कार्यकर्त्यांमध्येही सौ. निशा बाहेकर यांच्या उमेदवारीबद्दल चर्चेला जोर आला आहे.