बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. खामगाव नगरपालिकेत सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर करण्यात आले असून अनेक इच्छुकांचे नगराध्यक्ष पदाचे स्वप्न पुन्हा भंगले आहे. लोणार, बुलढाणा आणि नांदुरा नगरपालिकांमध्येही पुन्हा सर्वसाधारण महिला आरक्षण लागू केले गेले आहे. त्यामुळे या नगरपालिकांतील निवडणुकीत महिला उमेदवारांसाठी मार्ग मोकळा झाला आहे.तसेच मेहकर मध्ये ( खुला प्रवर्ग) आणि शेगाव मध्ये (सर्वसाधारण) आरक्षण सुटलेला आहे
दरम्यान, देऊळगाव राजा नगरपालिकेत नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिला राखीव करण्यात आले असून, या वर्गातील महिला उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. चिखली नगरपालिकेत मात्र खुला प्रवर्ग आरक्षण जाहीर करण्यात आले असून या नगरपालिकेत सर्व उमेदवारांसाठी सरळ मैदान खुलं राहिलं आहे.
या आरक्षण सोडतीमुळे जिल्ह्यातील राजकीय रणनिती पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे. अनेक इच्छुक उमेदवारांचे राजकीय स्वप्न या निर्णयामुळे थांबले आहेत, तर काहींना संधी मिळाल्याने उत्साह वाढला आहे. निवडणुकीच्या मैदानात आता महिलांच्या उपस्थितीला प्रचंड ताकद मिळणार आहे. या निर्णयानंतर सर्वसामान्य आणि राखीव वर्गासाठी राजकीय रणनिती बदलणार आहे, आणि आगामी निवडणुका खूपच रंगतदार आणि उत्साही होण्याची चिन्हे देत आहेत.