spot_img
spot_img

मेहकर-लोणारमध्ये शिवसेनेच्या रणधुमाळीला कार्यकर्त्यांचा उस्फूर्त प्रतिसाद! आजारी असतानाही लोकांसाठी धावले आमदार खरात – कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह!

बुलडाणा (हॅलो बुलडाणा) आज३० सप्टेंबर २०२५ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेहकर-लोणार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली लोणार येथील कृष्णा मंगल कार्यालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात भव्य आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्साह उसळून वाहत होता. विचारमंचावर सहसंपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, छगन मेहेत्रे, जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवत, जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छीरे, युवा जिल्हाध्यक्ष नंदु कराळे, उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, तालुका समन्वयक तेजराव घायाळ, तालुका अध्यक्ष राजेंद्र बुधवत, युवा सेना तालुका अध्यक्ष जीवन घायाळ, सर्कल प्रमुख विजय मोरे, महिला आघाडी तालुका प्रमुख तारामती जायभाये यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीदरम्यान नेत्यांनी आक्रमक मार्गदर्शन करत निवडणुकीसाठी रणसज्जतेचा बिगुल वाजवला. स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रत्येक जागा शिवसेनेचीच असली पाहिजे असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. सर्व वक्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षशक्ती एकवटण्याचे आवाहन केले.

सकाळी ११ वाजता मेहकर येथे झालेल्या मेळाव्याला आणि दुपारी ३ वाजता लोणार येथील मेळाव्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवडणुकांची आतुरतेने वाट पाहत असल्याचे या मेळाव्यातून स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे आमदार सिद्धार्थ खरात हे आजारी असूनही सलाईनवर उपचार घेत असताना पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीस गेले आणि नंतर लोणार व मेहकरच्या या बैठकीस उपस्थित राहिले. त्यांच्या जिद्दीने आणि कार्यकर्त्यांप्रतीच्या बांधिलकीने सभेला जबरदस्त उर्जा मिळाली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!