बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, माजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व राज्यसभा खासदार व सर्वांना समावून घेणारे मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते थेट दिल्लीला दाखल! काँग्रेसशी संबंधित नेते असणे स्वाभाविकच; शिवसेना (उबाठा)च्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके आणि संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर,अमीन खान उस्मान खान माजी नगरउपाध्यक्ष महाविकास आघाडीतल्या समीकरणांमुळे अपेक्षितच होती.
पण खरा ट्विस्ट – नुकतेच काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले नेते विजय अंभोरेही थेट दिल्लीला जाऊन वासनिक यांना शुभेच्छा देताना दिसले. वाढदिवसाच्या निमित्ताने दिसलेली ही उपस्थिती नेमकी शुभेच्छांची होती की पुढील राजकीय समीकरणांची चाचपणी? हा मोठा प्रश्न बुलढाण्यात गाजू लागला आहे.
याशिवाय पत्रकार अजय बिल्लारी आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे सिव्ह सहाय्यक श्रीकृष्ण शिंदेही उपस्थित होते. मुकुल वासनिकांच्या वाढदिवशी दिसलेले हे नेते आणि त्यांची एकत्र उपस्थिती यामुळे बुलढाण्यात राजकीय चर्चेला चांगलाच उधाण आले आहे.