spot_img
spot_img

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले… मत चोरीमुळेच काँग्रेस जिल्हाध्यक्षांवर दहशतवाद्या सारखे गुन्हे दाखल!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘उलटा चोर कोतवाल को दाटे’ ही म्हण वारंवार मतचोरीच्या अनुषंगाने सिद्ध होत असल्याचे आणि निवडणूक आयोगच स्वतः उलट्या बोंबा ठोकत असल्याचे रोखठोक मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. चिखली येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यावर ‘मी धावतो मत चोरी रोखण्यासाठी’ ही मॅरेथॉन स्पर्धा घेतल्यामुळे त्यांच्यावर दहशतवाद्या सारखे गुन्हे दाखल केल्याची खंत सपकाळ यांनी व्यक्त केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात
‘मी धावतो मतचोरी रोखण्यासाठी’ ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेची रीतसर परवानगी घेण्यात आली होती.चिखलीत मात्र या स्पर्धेने भाजपाचा तिळपापड झाला. मुख्यमंत्र्यांचे पर्सनल पीए विद्याधर महाले यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचेवर विविध गुन्हे दाखल करण्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांना भाग पाडले,या कारवाईमुळे ‘सरकार हमसे डरती है, पूलीस को आगे करती है!’ असे दिसून येत असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!