बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्याकडील भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार काढून बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.भंडाऱ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आता पंकज भोयर झालेत.
बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री सध्या मकरंद पाटील आबा आहेत. दरम्यान
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाने भंडारा येथील ना.संजय सावकारे यांना बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्री नियुक्ती देण्यात आली आहे.भंडारा हे जाण्यासाठी दूर व अडचणीचे ठरत असल्याचे वृत्त आहे.तर काही स्थानिक भाजप नेत्यांच्या नाराजीमुळे त्यांची उचलबांगडी केली,अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.