चिखली (हॅलो बुलढाणा) स्वर्गीय राजीव गांधींसारखा युवा पंतप्रधान देशाला लाभल्याने युवकांच्या हिताचे अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले गेले. वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना मतदानाचा अधिकार देऊन त्यांनी युवकांना निर्णय प्रक्रियेत संधी दिली. मात्र आताचे भाजप सरकार निवडणूक आयोगाच्या सहकार्याने मतदान चोरी करुन युवकांचा तसेच देशातील नागरिकांचा मतदानाचा हक्कच हिरावून घेत असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सिद्ध केले. तसेच निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत झालेल्या फेरफाराविरोधात बिहारमध्ये ‘मतदान अधिकार यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने १ कोटी मतदार निर्माण केले. या मतदान चोरीच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस लवकरच मोर्चा काढणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिली.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त बुधवार २० ऑगस्ट रोजी चिखली येथील अनुराधा अभियंत्रिकी महाविद्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राहुल बोंद्रे बोलत होते. पुढे बोलताना बोंद्रे म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशसारख्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला. त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला झाला. भाजपाने लोकशाहीला पायदळी तुडवून जनतेचे मतदानाचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. माझे मत माझा अधिकार हा कायम राहावा यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने लढा देत आहे.
याप्रसंगी शाम उमाळकर, माजी आमदार राजेश एकडे, डॉ. अरविंद कोलते, स्वातीताई वाकेकर, लक्ष्मणराव घुमरे, रामविजय बुरुंगले, मोहतेशाम रजा, संभाजी शिर्के, अनंतराव वानखेडे, मंगलाताई पाटील, कलीम खान, रामभाऊ जाधव, राहुल सवडतकर, दिलीप जाधव, अंबादास बाठे, विजय शेजोळ, रमेश कायांदे, गजानन खरात, सतीश मेहेंद्रे, समाधान सुपेकर, मोहन जाधव, प्रा. राजू गवई, निलेश पाऊलझगडे, प्रा. सुनील सपकाळ, जकिर कुरेशी, तुळशीराम नाईक, डॉ. इसरार, विष्णु पाटील, दिपक देशमाने, नंदु भाऊ सवडतकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील सपकाळ यांनी तर आभार डॉ. इसरार यांनी मानले.
▪️काँग्रेस राबविणार ‘मी धावतो मतदान चोरी रोखण्यासाठी’ अभियान!
एकाच व्यक्तीचे मतदार म्हणून अनेक राज्यांमध्ये नोंदणी होणे, एका छोट्याशा खोलीत शेकडो मतदार असणे, मतदारांचे वय १०० वर्षापेक्षा जास्त असण्याचे प्रमाण यासारखी उदाहरणे समोर आली असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सांगितले. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासह त्यांच्या हक्काचे महत्व पटवून देण्यासाठी मी धावतो मतदान चोरी रोखण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच बळीराजाने बैलपोळा या सणाला बैलाला सजवतांना व्होट चोरीचा निषेध करावा, असे आवाहनही राहुल बोंद्रे यांनी केले आहे.