बुलडाणा (हॅलो बुलडाणा) भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विनायक भाग्यवंत यांच्या वाढदिवसानिमित्त 9 ऑगस्ट रोजी शहरात जंगी सोहळा पार पडला. भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले पाटील, जिल्हाध्यक्ष आ. विजयराज शिंदे, जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख (खामगाव), माजी जिल्हाध्यक्ष गणेश मांटे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत केक कटिंग व फटाक्यांच्या आतषबाजीत वाढदिवस साजरा झाला.वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष गोकुळजी शर्मा यांच्या हस्ते झाले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या टीमने तब्बल 210 गरजू रुग्णांची मोफत तपासणी करून सेवा दिली. शिबिर यशस्वी केल्याबद्दल बावनकुळे साहेबांच्या हस्ते डॉक्टर टीमला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी बावनकुळे साहेबांनी विनायक भाग्यवंत यांच्या जिल्ह्यातील कार्याचा गौरव करत “लवकरच त्यांना मोठी जबाबदारी देणार” अशी घोषणा केली. आमदार श्वेताताई महाले पाटील यांनीही त्यांच्या कार्यामुळे निवडणुकीत मिळालेल्या यशाचा गौरव करत युवा मोर्चाचा विजयातील मोलाचा वाटा मान्य केला.
कार्यक्रमात महिला भगिनींनी बावनकुळे साहेबांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारथी फाउंडेशन, विनायकभाऊ मित्र परिवार, युवा मोर्चा तालुका व शहर टीमने परिश्रम घेतले. कार्यक्रमास असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.