spot_img
spot_img

उबाठाच्या बापात दम नाही…शब्द घेतले मागे! – जयश्रीताई शेळके म्हणाल्या… ‘बापाच्या आशीर्वादाने पहिल्यांदा निवडून आले!’ – ‘बेताल वक्तव्य व चुकीच्या वागणूकची कॉपी चांगली माणसं नक्कीच करणार नाहीत!’

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) उबाठाच्या बापात दम नाही, असे वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले. ‘उबाठ्याचा बापही माझी कॉपी करू शकत नाही’ या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, विरोधकांनी जोरदार टीका केली. अखेर गायकवाड यांनी स्पष्टीकरण देत यु-टर्न घेतला.मात्र उबठा शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी यावर झणझणीत प्रहार केला आहे. ‘बेताल वक्तव्य व चुकीच्या वागणूकची कॉपी चांगली माणसं नक्कीच करणार नाहीत!’ असा टोला लगावत शेळके म्हणाल्या की,तीनदा पराभूत झालेल्या या आमदाराला शिवसेना हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या बापानेच आशीर्वाद दिला व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिल्याने हे महोदय पहिल्यांदा विधानसभेची पायरी चढू शकले.आता ते म्हणतात की, 10 जन्म माझी कोणी कॉपी करू शकत नाही.कॉपी किंवा अनुकरण ही चांगल्या गोष्टींचे करायचे असते, बेताल वक्तव्य व चुकीची बेताल वागणूक याची कॉपी चांगले माणसे करत नाहीत,असा घणाघात शेळके यांनी आमदार गायकवाड यांचा समाचार घेताना केला.

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काल महायुती सरकारमधील वादग्रस्त आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाने राज्यभर ‘जनआक्रोश आंदोलन’ केले. या आंदोलना दरम्यान मुंबईसह अनेक ठिकाणी पथनाट्य, घोषणाबाजी आणि नाट्यमय आंदोलने करण्यात आली. त्यामध्ये काही दिवसांपूर्वी गायकवाड यांनी केलेल्या कृत्याचं पथनाट्यात रूपांतर करून सादरीकरण करण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड यांनी ‘माझी कॉपी कोणीही करू शकत नाही. मी ओरिजनल आहे, इतकंच काय तर उबाठ्याचा बापही माझी कॉपी करू शकत नाही’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.हे वक्तव्य सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात जोरदार व्हायरल झाले. विरोधकांनी गायकवाड यांच्यावर टीकास्त्र सोडले. खासदार विनायक राऊत यांनी तर थेट टीका करत म्हटले की, “गायकवाड यांची भाषा ही महाराष्ट्राच्या राजकारणातील घाणेरडी संस्कृती दाखवते. अशा लोकांच्या वक्तव्यामुळे जनतेत राजकारणाबद्दलची घृणा वाढते. महाराष्ट्रातील जनता त्यांना त्यांचा ‘बाप’ दाखवून देईल.” शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया देताना सांगितले, “त्यांची कॉपी करणं हे कोणत्याही सज्जन आणि कर्तबगार माणसाचं काम नाही. अशा शब्दांचा वापर करून लोकशाहीतील चर्चेची पातळी खालावली जाते. “वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे आणि वाढत्या दबावामुळे आज संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण देत यु-टर्न घेतला. त्यांनी सांगितले, “मी तसे बोललो नाही. तुम्ही माझ्या शब्दाचा विपर्यास केला आहे. मी उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांविषयी बोललो होतो. बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचे दैवत आहेत, ते सर्वांचेच बाप आहेत. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे.”दरम्यान जय शितल शेळके म्हणाल्या की, वास्तव सिद्ध करण्यासाठी किंवा सत्य मांडण्यासाठी खूप हिम्मत लागते. ती हिंमत नकली शिवसेनेच्या नकली लोकांमध्ये नक्कीच नाही.शिंदे गटाचे जे आमदार जी बेताल वक्तव्य करतात ते हा स्वतःचा इतिहास विसरले असतील,परंतु लोक विसरत नाहीत.तीन वेळा पराभूत झालेल्या या आमदाराला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद दिला,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली तेव्हा पहिल्यांदा हे आमदार विधानसभेची पायरी चढू शकले.आता ते म्हणतात…माझे 10 जन्म कुणी अनुकरण करू शकत नाही.खरंच आहे या जन्मात त्यांचे अनुकरण कुणीच करू शकत नाही कारण अनुकरण हे चांगल्या गोष्टींचे करायचे असते बेताल व गैरवर्तुणकीचे अनुकरण चांगली माणसे करीत नाहीत,असे शेळके म्हणाल्या.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!