बुलढाणा (हॅलो बुलढाणा) उद्धव ठाकरे गटाने महाराष्ट्रात महायुती सरकारातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन केले. बुलढाणा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी निदर्शने केली. मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत विविध प्रकारचे फलक आणि प्रतिकात्मक देखावे प्रदर्शित करण्यात आले.
येथील जिजामाता प्रेक्षागारा समोर आज 11 ऑगस्ट रोजी ठाकरे सेनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, या मागणीसाठी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे कार्यकर्त्यांकडून प्रात्यक्षिक करण्यात आले. त्याचबरोबर मंत्री संजय शिरसाट यांची पैशाने भरलेली बॅग आणि हनी ट्रॅप व डान्सबार,अघोरी विद्या संदर्भात देखील प्रात्यक्षिक करून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी मान्यवर जालिंदर बुधवत, जयश्रीताई शेळके,आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह हजारोच्या संख्येने सैनिक उपस्थित होते.