बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी होतील.अशात वोटिंग ईव्हीएम मशीनबाबत संभ्रमावस्था असल्यावरही राज्य निवडणूक आयोगाने ईव्हीएम चा वापर केला जाईल परंतू व्हीव्हीपॅटचा वापार केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत संभ्रमावस्था व शंकेला वाव मिळत असून,हा तुघलकी व मनमानी पध्दतीचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया उबाठा गटाच्या राज्यप्रवक्त्या जयश्री शेळके यांनी व्यक्त केली.
गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या दिवाळीनंतर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्या
अखेरीस या निवडणुकांसाठीची प्रक्रिया सुरू होईल. या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात येणार आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत निवडणूकपूर्व तयारीची माहिती दिली. त्यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केवळ ईव्हीएमचा वापर केला जाईल. व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान हा निर्णय तुघलकी असून शंका निर्माण करणारा असल्याचे मत जयश्री शेळके यांनी व्यक्त केले आहे