spot_img
spot_img

शेतकरी क्रांती संघटनेचे संस्थापक बिलेवार यांच्यासह शेकडो समर्थक ठाकरे गटात!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षात पक्षप्रवेश सुरू आहे. दम्यान आज बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बिलेवार यांनी त्यांच्या शेकडो समर्थकासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून आपली संघटना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये विलिन केली! यावेळी शिवसेनेचे नेते संपर्कप्रमुख खा. अरविंदभाई सावंत, बुलढाणा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शिवसेना सहसंपर्कप्रमुख, वसंतराव भोजने, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख लखनभाऊ गाडेकर, शिवसेना तालुकाप्रमुख श्रीराम खेलदार, युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे, यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
राजकारण्यांना विकासात्मक घडामोडीचे काही घेणे देणे नाही. अशात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काळात होणार आहे.त्यामुळे कुठे आपला जुगाड जमेल असा पवित्र अनेकांनी घेतला.मात्र निष्ठावान कार्यकर्ते योग्य त्या पक्षात जात असतात. दरम्यान आज बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बिलेवार यांनी त्यांच्या शेकडो समर्थकासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून आपली संघटना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये विलिन केली! यावेळी शिवसेनेचे नेते संपर्कप्रमुख खा. अरविंदभाई सावंत, बुलढाणा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शिवसेना सहसंपर्कप्रमुख, वसंतराव भोजने, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख लखनभाऊ गाडेकर, शिवसेना तालुकाप्रमुख श्रीराम खेलदार, युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे, यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!