डोणगाव (हॅलो बुलडाणा) शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या डोणगावात शिंदे गटाला जबर धक्का बसला आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचा राजीनामा देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जोरदार प्रवेश केला. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोणगाव येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात शिंदे गटाचे जावेद खान यांच्यासह ६५ प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात, उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव यांच्यासह अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
शिंदे गटात असलेले जावेद खान, शफीक शेख, सलमान कुरेशी, सिद्धार्थ खोडके, नसीर शाह आदी कार्यकर्त्यांनी “उद्धव बाळासाहेब ठाकरे” यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत उडी घेतली. यामुळे शिंदे सेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
या वेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी आक्रमक भाषणात सांगितले, “अब डरो मत! परिवर्तन सुरू झालंय. जनता आता नव्या शिवसेनेसोबत आहे. शिंदे गटाचे दिवस संपले आहेत. येणारा काळ उद्धव सेनेचा सुवर्ण काळ ठरेल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.