spot_img
spot_img

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची तोबा गर्दी!

सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा- प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली आहे सिंदखेड राजा शहरात सरकारी दवाखान्याजवळ असलेल्या महा ई सेवा केंद्रांवर रस्त्यापर्यंत महिलांच्या रांगा लागल्या आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरीम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे १ जुलैपासून पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे राज्य सरकार महिलांना दरमहा १५०० रुपये देणार आहे त्या साठी वयाची अट २१ ते ६० वर्षापर्यंत महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!