बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘खिशात नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा.. असे नेहमीच सांगणारे शिवसेना उबाठाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटले. बजेट घोषीत झाल्यानंतरची ही त्यांची प्रतिक्रिया आहे.
अंबादास दानवे हे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते असून सध्या त्यांच्याकडे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. महापालिकेच्या राजकारणातून कारकीर्दीची सुरुवात करणारे अंबादास दानवे हे 2003 पर्यंत नगरसेवक होते. 2011 मध्ये त्यांची शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची आक्रमक टीकाटिपणी अनेकांचे लक्ष वेधून घेणारी आहे. स्पष्टवक्ते म्हणून त्यांची ही ओळख आहे. महाराष्ट्राचे इतिहासात पहिल्यांदा चांगला अर्थसंकल्प घोषित करण्यात आला. लेक लाडकी योजना.. सोयाबीन कापसाला अनुदान.. शेतकऱ्यांना पगार.. सौर पंप आणि सुटका.. अशा योजना शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आल्या आहे. परंतु ज्यांना या सरकारचं काम समजलं नाही किंवा सरकार विरुद्ध जळफळाट आहे. ‘खिशात नाही दाना’..असे म्हणणाऱ्या दानवे यांनी त्यांच्या मतदार संघात महिलांना एक जुलै नंतर लाडकी योजनेचे पैसे पडतात की नाही? हे तपासून पहावे.. असे आव्हानच आमदार संजय गायकवाड यांनी दिले आहे. शेतकऱ्यांना जाहीर झालेली मदत देणे सुरू झाली असून इतरांना लवकरच प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे आमच्या सरकार कडून ‘मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना’सुरू होत आहे. यामध्ये साठ वर्षाच्या वरील व्यक्तींना लाभ देण्यात येणार आहे.