बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्ती मार्ग संदर्भात आज पासून आत्मक्लेष आंदोलन जिल्हा कचेरी समोर छेडण्यात आले आहे. हे आंदोलन आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून तर करण्यात आले नाही ना? असा प्रश्न चर्चिला जात आहे.
विधानसभा निवडणूक जवळ आली असताना हा प्रश्न अनेक इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने रेटला आहे. त्यामध्ये काँग्रेसचे राहुल बोंद्रे लोकसभेत काँग्रेसची थोडीफार ताकद वाढल्याने पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहे.सिंदखेड राजा शेगाव महामार्गावरील होणारा भक्ती मार्ग रद्द करण्यात यावा, ही मागणी शेती गेलेल्या शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे.
रद्द करा रद्द करा गरज नसलेला महामार्ग रद्द करा..जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची.. अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. भक्ती मार्ग रद्द करण्यासाठी कृती समितीने एकच नारा दिला. या आत्मक्लेष आंदोलनात सिंदखेड राजा व शेगाव येथील शेतकऱ्यांचा सहभाग दिसून आला. परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा लोकप्रतिनिधींच्या आहारी जाऊ नये, न्याय हक्कासाठी आपण सुद्धा लढा देऊ शकतो, हे पण विसरायला नको.